Tuesday, 9 August 2016

तुम्ही कोण? गार्गी का माधवी?

दारावरची बेल वाजली.
माधवी किती तरी वर्षांनी गार्गी ला भेटायला अली होती.

माधवी : "किती बदललीस ग, कॉलेज मध्ये होतीस तेव्हा अगदी बारीक होतीस"
गार्गी : हो ना.बाकी कसे चाललंय?तू मात्र लग्नानंतर अमेरिकेला गेलीस काय आणि आता परत येतेस काय?
          फेसबुक मुळे परत भेटलो ते बरे झाले.
माधवी : हा हा हो फेसबुकचीच कृपा.अरे ह्याची ओळख करून द्यायची राहिलीच.
            हा माझा मुलगा सुयोग.आता 7 वर्षाचा झाला.सुयोग काकूंना नमस्कार कर.
सुयोग : नमस्कार काकू...काकू काकू मी ती खेळणी घेऊ का खेळायला?
गार्गी : किती गोड आहे ना.हो घे ना.माझा पण मुलगा येईलच आता स्कुलमधून.
 (बेल वाजते)
गार्गी : हा काय आलाच.मनोज देखो देखो कौन आया है.ये है तुम्हारी ऑंटी और ये उनका बेटा सुयोग.वो ना बहुत           दूर से आये है.

माधवी : (गोंधळून) काय ग? एकदम हिंदी? तुझा नवरा हिंदी आहे का?
गार्गी : छे ग कसला हिंदी? ह्याला सांभाळायला बाई असतात ना त्यांना मराठी येत नाही.स्कुल पण    
          इंग्रजी,शेजारची मुले पण हिंदीत बोलतात.मग आम्हीच म्हटले त्याचे कन्फयुजन होण्यापेक्षा हिंदी
          बोललेली काय वाईट.बाळ आई का काय म्हणते पहिल्यांदा ते झाले मराठीत त्यानंतर पुढे हिंदीच

माधवी : अगं पण अशाने तो मराठी कधी शिकणार?माझा मुलगा बघ अमेरिकेला जाऊन सुद्धा मी त्याचे मराठी
             संस्कार कमी पडू दिले नाहीयेत.आणि आता इथेच परत आलोय तर मराठी हवीच.

गार्गी : नाही ग इथे कशाला लागतेय मराठी.संभाळणाऱ्या बाईंना मराठी येत नव्हते, दिवसभर त्याच
          सांभाळतात त्याला म्हणून मीच त्याला मराठी शिकवायचा आग्रह धरला नाही.मराठी बाई पण मिळत
           नाहीत एकतर सांभाळायला.

माधवी : अगं पण त्यांना किती वर्ष झाली इथे? 5-6 तरी नक्की झाली असतील ना? मग त्यांना मराठी येत नाही             म्हणून तुम्ही तुमची भाषा बदलणार? आणि ह्याचा पुढच्या पिढीचे काय? मी अमेरिकेत होते तेव्हा
            माझा जीव तुटायचा मराठी साठी.कधी एकदा भारतात परत येतो असे झालेले.मराठी नाटक,सिनेमे,
            ......, आपले खाद्यपदार्थ किती किती मी मिस केले माहितेय? तिथे काही दुकानात मिळायचे पदार्थ
            पण आपल्या माणसात बसून खाण्याचा जो  आनंद आहे ना त्याला तोड नाही.............

तुम्ही कोण? गार्गी का माधवी?
बाहेरच्या लोकांसाठी तुम्ही तुमची भाषा बदलणार का आपली संस्कृती टिकवणार?